बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११


  •                         कराड नगरपालिका निवडणूक सर्व काही एका क्लिक वर

    कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आघाड्याचे चित्र हळू हळू स्पष्ट होऊ लागले आहे.उमेदवारी अर्ज दाखल होतील तसे तसे लढतीचे चित्रही स्पष्ट होईल.उमेदवाराकडून हायटेक प्रचाराचे तंत्र वापरणे हि गोष्ट आता नवीन राहिली नाही
    निवडणुकी संदर्भातील सर्व माहिती संकेत स्थळाच्या माध्यमातून एका क्लिक वर उपलब्द झाल्याने नागरीकांची चांगली सोय झाली आहे.
    महाराष्ट्र विधानसभा,लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसह सांगली,अहमदनगर,ठाणे,नागपूर,नवी मुंबई, कल्याण डोंबिवली,नांदेड,धुळे, महापालिका व सोलापूर,
    बीड जिल्ह्याच्या विविध निवडणुकांमध्य आजपर्यंत यशस्वीरीत्या राबवलेल्या "अल्टीमेट इन्फोर्मेशन टेक्नोलोजी "या कंपनीने www.karadelection.org या संकेतस्थळाची निर्मिती व विकास केला आहे. दैनदिन जीवनात इंटरनेटचा वाढलेला वापर व तरुण सुशिक्षित मतदार यांच्यासाठी हे संकेतस्थळ उपयोगी ठरत आहे .मतदारांना घरबसल्या उमेदवारांची माहिती,चिन्ह,तसेच आपले नाव मतदारयादीतून शोधानाचे सहाय्य उपलब्द आहे.कराड नगरपालिकेच्या १ ते ७ प्रभाग रचना लोकसंख्या, तेथील आरक्षण एवढेच नाही तर प्रभागनिहाय आजा.आज. ची संख्या एका क्लीक वर मिळत आहे.प्रभागाचा नकाशा,प्रभागात समाविष्ट असलेल्या पेठा,चौक, इ.ची माहिती संकेतस्थळावर दिली आहे.
    माहितीबरोबरच जंनजागृतिचे कामही हे संकेतस्थळ करत आहे .उमेदवार व मतदारांना महत्त्वाच्या सुचना ,बूथ उभारातानाचे नियम,कलम १४४ चा प्रतिबंधात्मक आदेश व मतदानास येताना ओळखपत्राशिवाय ओळखीदाखल सादर करावयाच्या इतर पुराव्याची यादी प्रसिद्ध केल्यामुळे निवडणुकीच्या एकंदर प्रक्रियेत सामान्य मतदार उत्साहाने सहभागी होतील असे वाटते
    संपूर्ण कराड शहराची प्रभागनिहाय मतदारयादी संकेतस्थळावर उपलब्द असल्याने मतदारांना
    यादीतील आपला अनुक्रमांक घरबसल्या प्राप्त होत आहे.एस.एम.एस.सुविधा वापरून यादीतील आपला
    अनुक्रमांक जाणून घेण्याची सोयही लवकरच सुरु होणार आहे
    महत्वाचे संपर्क दूरध्वनी दिल्याने नागरीकांचा वेळी वाचतो आहे .अर्ज दाखल होतील तसे तसे उमेदवारांची माहिती,चिन्ह,आघाडी यांची माहिती मिळत आहे .या संकेतस्थळाला राज्य निवडणूक आयोग व भारत निवडणूक आयोग यांचा सांधा (लिंक )जोडल्यामुळे स्थळाला भेट देणारा वाचकाच्या माहितीत भर पडत आहे .

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०११

टवाळा आवडे विनोद

  तसे पाहिले तर विनोद न आवडणारा मराठी माणूस सापडणे हि फारच विरळ गोष्ट .
विनोद व विनोदाची अंगे, निर्मिती या बाबतचा प्र.के.अत्रे यांचा शालेय जीवनातील एक धडा
अजूनही आठवला कि आत्ता बदलत्या काळानुसार माराठी विनोदही  कात टाकत असल्याचं
जाणवत.  प्र.के.अत्रे  काळातले साहित्यिक विनोद शब्दिक कोटया अगदी वरच्या श्रेणीत मोडत असत “टवाळा आवडे विनोद ” अशी समजूतही खोटी पडावी अशी सध्याची अवस्था आहे .
पुर्वी वर्तमानपत्रातील रविवार पुरवणी ,दिवाळी अंक यापुरता मर्यादित असलेला विनोद महाजालाच्या रूपाने  आपल्या समोर आला तो आपलं रूपड बदलूनच ,त्या अनुषंगाने अवघी तरुणाई राजकारण, महागाई , सामाजिक प्रश्नावर विविध विनोदी चुटकुले तयार करू लागले . हि त्याची सजगता समजायला हवी .गुरुजी -मुलगा (बंड्या), आरोपी-वकील  यातून मराठी विनोद बाहेर पडला व नवीन पात्राचा   जन्मही झाला . संता- बंता , सरदार , नवरा-बायको , चिंगी -चिंटू हि नवीन विनोदी पात्रे आली आणि मराठी विनोद अधिक बहरला हे मात्र खर.
          हे माझे केवळ संकलन आहे  त्यांच्या मुळ लेखकाना आणि  त्यांच्या विनोद बद्धीला  सारे श्रेय देऊन----
                                      मला आवडलेले काही खास विनोद तुमच्यासाठी 
बॉस :- तुला नोकरी वरून काढल्यापासून तू रोज माझ्या घरासमोर हागायला का बसतोस ?
 नोकर :- मला हे दाखवायचे कि,तुम्ही मला नोकरीवरून काढल्यामुळे मी उपाशी नाही मरत......
--------------------------------------------------------------------------------------------------------- 
  
 
जसा भारताचा राष्ट्रीय पक्षी  ?  -------- मोर  
         राष्ट्रीय प्राणी ? ------     वाघ 
         राष्ट्रीय  फुल   ? ------    गुलाब  
         राष्ट्रीय मेहमान ?   ------ कसाब 
         राष्ट्रीय पागल ? ---------- दिग्विजय 
---------------------------------------------------------------------------------------------------------    
एक मुलगा शी करायला बसला,काही केल्याने शी काही होईना ,मुलगा वैतागला व म्हणाला
" अरे  ये की  बाहेर ,तुला  का खाऊन  टाकतोय  होय ?  "
---------------------------------------------------------------------------------------------------------  
पेट्रोल ७१ रुपये झाल्यावर एकदा गंपू पेट्रोलपंपावर जातो..
.पंप ऑपरेटर -कितीचं टाकू साहेब ?
गंपू - "अरे १० रुपयाचं शिंपड गाडीवर, बाहेर नेऊन जाळायचीच तर आहे "
---------------------------------------------------------------------------------------------------------  
बायको : अहो एक सांगू का? पण मारणार तर नाही ना?
नवरा : हो सांग ना. बायको : मी गरोदर आहे. नवरा : अग हि तर आनंदाची बातमी आहे मग तू एवढी घाबरतेस का?
बायको : कॉलेजला असताना हि बातमी बाबाना सांगितली होती तेव्हा त्यांनी मारलं होत.
--------------------------------------------------------------------------------------------------------- 
चिकटराव  मेंगोजूस घेऊन बसला होता... नाम्या आला आणि तो जूस पिऊन टाकला..
. चिकटराव : माझे दिवसच खराब आहे... मुलगा नापास झाला...बायको सोडून गेली......नोकरी गेली...नळाला पाणी नाही...घरात लाईट नाही... आणि आता जीव द्यावा म्हणून जूस मध्ये विष टाकले होते.......आणि तेही तू प्यायलास ..
--------------------------------------------------------------------------------------------------------- 



सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०११

हास्य टॉनिक थोडे थोडे घ्याच !

महाजालात मनसोक्त फेरफटका टाकताना मराठी विनोद शोधणे हि माझी खास आवड. तसे पाहिले तर सोशल नेटवर्क वर रोजच असंख्य विनोदी पोस्ट येवून पडतात, पण सगळेच काही काळात विसरून जातात. म्हणूनच आज मी आपल्यासाठी वेचलेले अनेक निवडक  मराठी विनोद एकाच ठिकाणी या ब्लॉगच्या माध्यमातून ठेवत आहे . मराठी विनोदाचा संग्रह म्हणा याला हवं तर . हसणे आरोग्यासाठी चांगलं असतं असं म्हणतात! 
चला तर मग हे हास्य टॉनिक आता थोडे थोडे घ्याच
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*************************************************************************************
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
गंपू : माझं मन म्हणजे मोबाइल आहे... आणि तू त्यातलं सिमकार्ड!!
गम्पी : काय सांगतोस ?
गंपू : पण जास्त हुरळून जाऊ नको.... हा ड्यूअल सिम मोबाइल आहे!!
--------------------------------------------------------------------------------
आपटे:- काय जोशी आज खुश दिसत आहात..???
जोशी:- अरे गोडबोले ला लॉटरी लागली...
आपटे:- मग तुम्ही का खुश आहात???.
जोशी:- त्याला तिकीट सापडत नाहीये
----------------------------------------------------------------------------------
मित्रांची ती कोणती गोष्ट असते
जी
मनाला खूप त्रास देते .....
माझा अभ्यास झाला...
तुझा झाला का ...??
---------------------------------------------------------------------------------------
तीन मच्छर आपापसात बोलत होते..
त्यातील... १ला मच्छर: मी डॉक्टर बनणार...
२रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे...
3रा मच्छर: मी वकील बनणार आहे,...
... ... ... तितक्यात काकू मॉर्टिन लावतात...
तिन्ही मच्छर चिडून: ... आख्ख्या करीअरची वाट लावली...
------------------------------------------------------------------------------------
चंदूच्या बायकोचे मराठी थोडे
कच्चे असते...... ..
तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत
नसते...... ..
तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण
विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ......
ते असे.......
"प्रिय प्राण नाथ,
तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला .
काल मुलगा झाला आजीला.
दम्याचा त्रास होतो कुत्रीला.
आज चार पिल्ले झाली मामाला.
दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला.
दवाखान्यात admit केले बकरीला.
हजार रुपयात विकले आत्याला.
नमस्कार तुमची लाडकी
मुन्नी..!!
--------------------------------------------------------------------------
एक डॉक्टर एका लहान मुलाच्या घरी जातात.
त्यांना त्या मुलाच्या पायाचे टाके काढायचे असतात.
त्यावेळी त्याचं लक्ष दुसरीकडे राहावं म्हणून झाडाकडे बोट दाखवून त्याला म्हणतात, “ती बघ तिकडे चिमणी.”
लहान मुलगा : ओ चिमणीचे मामा, खाली नीट बघा नाहीतर पाय कापाल माझा
-------------------------------------------------------------------------------------------------
पुजरयाला हगवन लागली , पुजारी डॉक्टर कड़े औषध घेण्यास गेला. डॉक्टर ने औषध वैगेरे दिलं -
पुजरयाने विचारलं - '' कही पथ्य वैगेरे ?''
डॉक्टर - '' तसं काही विशेष नाही , फ़क्त तो शंख जरा हलू वाजवत चला ''
-------------------------------------------------------------------------------------------------
एका गावात वाघाने उच्छाद मांडला होता, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी
शिकारयाला बोलावण्यात आल.
शिकारी : आज रात्रीच मी त्या वाघाचा बंदोबस्त करतो, मला गाईच कातड आणून
द्या, ते पांघरून जंगलात जातो, गाय आहे समजून वाघ धावून येईल मग मी
त्याला ठार करतो.
मध्यरात्रीनंतर शिकारी गावात धावत आला, अंगावरच कातड फाटलं होत,
गावकरी : मारला? वाघ... मारला?
शिकारी : वाघ राहू द्या, आधी हे सांगा जंगलात बैल कोणी सोडला होता?
-------------------------------------------------------------------------------------------------
लग्न झालेल्या मुली भांगेत कुंकू का लावतात?
कारण पोरांना कळावं कि ज्या प्लॉटवर त्यांची नजर पडलीय, त्याच भूमिपूजन आधीच झालंय.
-------------------------------------------------------------------------------------------------
ऐश्वर्या राय ची वाढती लोकप्रियता बघून, भारत सरकारने तिचा postal stamp
बनवला. ऐश्वर्यापण खुश आणि stamp चा खप वाढल्या मुळे भारत सरकार पण खुश. पण
तक्रारी यायला लागल्या कि stamp नीट चिकटत नाहीये.
सरकारने लगेच एक समिती नेमली. अर्ध्या तासात समितीने अहवाल दिला
'stamp च काम एकदम व्यवस्थित
...झालंय, पण लोक चुकीची बाजू चाटत आहेत.'
-------------------------------------------------------------------------------------------------
तुज्या डोक्यात
गुलाबाचा फुल घातले असते
आता पण घालावे
वाटते पण
कुंडी सकट..........!!!!!!
---------------------------------------------------------------------------------------------------------
Modern स्त्रीची वटपौर्णिमा
वडाला फेरे मी मारते
round by round
पुढच्या जन्मी हाच पती
should not be found
------------------------------------------------------------------------------------------
लग्नाआधी.....
प्रेयसी : जानू, चंद्र कुठे आहे ?
प्रियकर : प्रिये, दोन ठिकाणी आहे, एक
तू आणि दुसरा आकाशात..
लग्नानंतर.....
... बायको : जानू, चंद्र कुठे आहे ?
नवरा : म्हशे, डोळे फुटले का? वर
आकाशात कोण तुझा बाप torch घेऊन
उभा आहे ....?
----------------------------------------------------------------------------
एका माणसाने १०० वेळा ब्लड बँकेत रक्तदान केले.................
त्याला बँकेने सन्मान चिन्ह दिले............
आणि त्याच्या बायकोला गिफ्ट दिले.........
...बायको : मला कशाला गिफ्ट दिले............(काहीतरीच, आता दिले तर राहू द्या )
बँक वाले : " आपने नही पिया.......... तभी तो हमने लिया
----------------------------------------------------------------------------------------------
मलिंगाची आई : "बाळा, जरा केस
कापून ये!"
मलिंगा : "का ग, आई ?"
मलिंगाची आई :
"पितळेची भांडी घासायची आहेत,
काथ्या संपला आहे!"
--------------------------------------------------------------------------------------------------------
बायको : अहो तुम्ही म्हणाला होतात ना की,
मी आता कारणाशिवाय दारू पीणार नाही म्हणून मग आता का पिताय????
नवरा : अग आता दिवाळी जवळ आली ना,
मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नको का ???? ;)
------------------------------------------------------------------------------------------------------
एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं ठरवतात, मुलगा पहिले उडी मारतो, पोरगी डोळे मिटते, आणि
मागे फिरते.....ते बघून पोरगा पाठीवरचं पॅरेशूट उघडतो आणि म्हणतो, साली चेटकीण मला माहित
 होत ही उडी नाही मारणार ..............
त्या दिवसापासून लोकं म्हणू लागले
......LADIES FIRST..
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निव्वळ मराठी विनोदाला वाहिलेला आमचा हा http://assalmarathisms.blogspot.com/
ब्लॉग आपल्याला नक्की आवडेल!   
                                                            अनिल माने  
                                                           9766599780
                                                     

रविवार, ३० ऑक्टोबर, २०११

आपल्याच मृत्यूची तारीख ???? नको रे बाबा !

नुकताच दै . सकाळ मधील उत्तम कांबळे लिखित एक लेख वाचनात आला.भविष्याच्या पोटात काय लपून राहिले आहे हे जाणून घेण्याची उस्तुकता मानव प्राण्याला असते आणि ती स्वाभाविकही आहे म्हणा ,परंतु चक्क आपल्याच मृत्यूची तारीख,महिना, साल जाणुन घेण्याची उस्तुकता व त्यावरील प्रतिक्रिया असा काहीसा लेखाचा विषय होता. लेख फारच उत्तम होता .त्याचाच एक सारांश मरणाच्या तारखा सांगणाऱ्या अनेक साइट कुणी कुणी तयार केल्या आहेत. त्या मरणही सांगतात.पुनर्जन्म कोणता आणि कुठं होणार, हेही सांगतात. ज्यांचा या गोष्टीवर विश्‍वास असतो, ते या साइटला चिकटतात आणि माहितीच्या नावाखाली पदरभर निराशा, दुःख घेऊन जगायला लागतात. पैसा मिळवण्यासाठीच्या या साइट आहेत. एकदा का जग व्यावसायाभिमुख झालं, की ते कशाचाही व्यवसाय करतं... जगण्याचा, मरण्याचा, खाण्याचा, उपाशी राहण्याचा, सुपोषणाचा आणि कुपोषणाचाही...या साईटचा पाठलाग केला तब्बल डझनभर तरी साईट आळून आल्या प्रत्येक साईटची वेगळीच खैसियत निव्वळ गंमत म्हणून एक नकली जन्म तारीख , वजन ,उंची ,आदी माहिती भरून मरणाची तारीख चेक केली एकच माहितीवेगवेगळ्या साईटवर भरली प्रत्येक साईटवर वेगळीच मृत्यूची तारीख दिसली. शुध्द फसवणूक दुसर काहीच नाही. "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" .केवळ गंमत म्हणून ठीक फार गंभीर होऊन चालणार नाही

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

बोलका पोपट: बोलका पोपट

बोलका पोपट: बोलका पोपट: "बोलका पोपट " हा माझा पहिला वहिला मराठी ब्लॉग  लहान मुलांसाठी बोलका पोपट तुमांला नक्की आवडेल . बस खाली दिलेली फाईल आपल्या संगणकावर  इन्टॉल क...

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०११

अण्णा हजारे व त्यांचे आंदोलन जर इतिहासाच्या पुस्तकात पोहचले तर -- - - - - -



अण्णा हजारे यांचे आंदोलन ऐतिहासिक झाले आहे त्यामुळे कदाचित काही पिढ्यानंतर ∙"स्वातंत्र्याचे दुसरे युद्ध "
नावाचे इतिहासाचे पुस्तक निघाले तर त्यावेळी असे प्रश्न असायला हरकत नाही

प्रश्न १. स्वातंत्र्याचे दुसरे युद्ध कोणी पुकारले ?
प्रश्न २. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणारी "टीम अण्णा " म्हणजे काय?
प्रश्न ३. अण्णा हजारे यांनी एकंदर किती उपोषणे केली ?
प्रश्न ४. सरकारी लोकपाल व जनलोकपाल यातील फरक स्पष्ट करा
प्रश्न ५ सरकारी लोकपाल कायद्याला "नखे ,दात नसलेली बिल का म्हंटले आहे ?
प्रश्न ६. सविस्तर टिपा लिहा
१. अण्णा हजारे २. रामलीला मैदानावरील घटनाक्रम ३. जैन व अण्णा हजारे संघर्ष
प्रश्न ७ रीकाम्या जागी योग्य उत्तर लिहा
१. अण्णा हजारे यांनी ------------------- घेवून उपोषण सोडले
२. अण्णा हजारे यांनी ------------------ दिवसांनी उपोषण सोडले
३. जनलोकपाल बिलाचा मसुदा ----------------- साली मंजूर झाला
४. रामलीला मैदानावर ---------------- या अभिनेत्याचे वादग्रस्त भाषण गाजले
५. अण्णा हजारे याना उपोषण सोडल्यानंतर ----------------------- हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले
प्रश्न ८ अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील गाजलेल्या घोषणा पूर्ण करा
१. अण्णा नाही ये आंधी है देश का दुसरा ----------------------
२. ------------------------------ हम तुम्हारे साथ है |
३. लोकपाल लाओ नाही तो ---------------------------
प्रश्न ९ . भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देण्याच्या काळात भारतात भ्रष्टाचाराची कोणती प्रकरणे घडली होती ?

शुक्रवार, २४ जून, २०११

ASSAL MARATHI SMS GROUP OF FACEBOOK BLOG: नव्या जमान्याच्या नव्या म्हणी

ASSAL MARATHI SMS GROUP OF FACEBOOK BLOG: नव्या जमान्याच्या नव्या म्हणी: "नव्या जमान्याच्या नव्या म्हणी ' आपणही सुचवा
१. वाचता येईना पुस्तक फाटके.
२. मोबाईलच्या बॅलंसला मिसकॉलचा आधार .
३. नाव ज्ञानेश्वर वाचता ये..."

बुधवार, १५ जून, २०११

फेसबुक ट्रिक्स अँड टिप्स

फेसबुक ट्रिक्स  अँड टिप्स
फेसबुकवर  स्टेटस  शेअर कताना अँनिमेटेड स्माइली , वाढदिवसाच्या शुभेच्छा तेही अँनिमेटेड केकसोबत आणि  शेअर  कण्याचा मजकूर रंगीत फोन्ट मध्ये   कशी वाटते कल्पना ! तर मग  हे सर्व अगदी मोफत मिळू शकते
http://www.sweetim.com/   या साईटवर 



गुरुवार, ९ जून, २०११

बोलका पोपट

"बोलका पोपट " हा माझा पहिला वहिला मराठी ब्लॉग 
लहान मुलांसाठी बोलका पोपट तुमांला नक्की आवडेल . बस खाली दिलेली फाईल आपल्या संगणकावर 
इन्टॉल करा व नंतर ती फाईल रन करा .हो पण हा पोपट चक्क तुमच्याच आवाजात बोलेल म्हणजे तुम्ही बोलाल तेच तो बोलेल यासाठी तुमच्याकडे मायक्रोफोन मात्र असायलाच हवा!
"बोलका पोपट "
"बोलका पोपट" इन्टॉल करण्यासाठीची फाईल येथे उपलब्ध  http://vina-digital-talking-parrot.en.softonic.com/





.