शनिवार, ८ ऑक्टोबर, २०११

अण्णा हजारे व त्यांचे आंदोलन जर इतिहासाच्या पुस्तकात पोहचले तर -- - - - - -



अण्णा हजारे यांचे आंदोलन ऐतिहासिक झाले आहे त्यामुळे कदाचित काही पिढ्यानंतर ∙"स्वातंत्र्याचे दुसरे युद्ध "
नावाचे इतिहासाचे पुस्तक निघाले तर त्यावेळी असे प्रश्न असायला हरकत नाही

प्रश्न १. स्वातंत्र्याचे दुसरे युद्ध कोणी पुकारले ?
प्रश्न २. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणारी "टीम अण्णा " म्हणजे काय?
प्रश्न ३. अण्णा हजारे यांनी एकंदर किती उपोषणे केली ?
प्रश्न ४. सरकारी लोकपाल व जनलोकपाल यातील फरक स्पष्ट करा
प्रश्न ५ सरकारी लोकपाल कायद्याला "नखे ,दात नसलेली बिल का म्हंटले आहे ?
प्रश्न ६. सविस्तर टिपा लिहा
१. अण्णा हजारे २. रामलीला मैदानावरील घटनाक्रम ३. जैन व अण्णा हजारे संघर्ष
प्रश्न ७ रीकाम्या जागी योग्य उत्तर लिहा
१. अण्णा हजारे यांनी ------------------- घेवून उपोषण सोडले
२. अण्णा हजारे यांनी ------------------ दिवसांनी उपोषण सोडले
३. जनलोकपाल बिलाचा मसुदा ----------------- साली मंजूर झाला
४. रामलीला मैदानावर ---------------- या अभिनेत्याचे वादग्रस्त भाषण गाजले
५. अण्णा हजारे याना उपोषण सोडल्यानंतर ----------------------- हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले
प्रश्न ८ अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील गाजलेल्या घोषणा पूर्ण करा
१. अण्णा नाही ये आंधी है देश का दुसरा ----------------------
२. ------------------------------ हम तुम्हारे साथ है |
३. लोकपाल लाओ नाही तो ---------------------------
प्रश्न ९ . भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देण्याच्या काळात भारतात भ्रष्टाचाराची कोणती प्रकरणे घडली होती ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा