रविवार, ३० ऑक्टोबर, २०११

आपल्याच मृत्यूची तारीख ???? नको रे बाबा !

नुकताच दै . सकाळ मधील उत्तम कांबळे लिखित एक लेख वाचनात आला.भविष्याच्या पोटात काय लपून राहिले आहे हे जाणून घेण्याची उस्तुकता मानव प्राण्याला असते आणि ती स्वाभाविकही आहे म्हणा ,परंतु चक्क आपल्याच मृत्यूची तारीख,महिना, साल जाणुन घेण्याची उस्तुकता व त्यावरील प्रतिक्रिया असा काहीसा लेखाचा विषय होता. लेख फारच उत्तम होता .त्याचाच एक सारांश मरणाच्या तारखा सांगणाऱ्या अनेक साइट कुणी कुणी तयार केल्या आहेत. त्या मरणही सांगतात.पुनर्जन्म कोणता आणि कुठं होणार, हेही सांगतात. ज्यांचा या गोष्टीवर विश्‍वास असतो, ते या साइटला चिकटतात आणि माहितीच्या नावाखाली पदरभर निराशा, दुःख घेऊन जगायला लागतात. पैसा मिळवण्यासाठीच्या या साइट आहेत. एकदा का जग व्यावसायाभिमुख झालं, की ते कशाचाही व्यवसाय करतं... जगण्याचा, मरण्याचा, खाण्याचा, उपाशी राहण्याचा, सुपोषणाचा आणि कुपोषणाचाही...या साईटचा पाठलाग केला तब्बल डझनभर तरी साईट आळून आल्या प्रत्येक साईटची वेगळीच खैसियत निव्वळ गंमत म्हणून एक नकली जन्म तारीख , वजन ,उंची ,आदी माहिती भरून मरणाची तारीख चेक केली एकच माहितीवेगवेगळ्या साईटवर भरली प्रत्येक साईटवर वेगळीच मृत्यूची तारीख दिसली. शुध्द फसवणूक दुसर काहीच नाही. "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" .केवळ गंमत म्हणून ठीक फार गंभीर होऊन चालणार नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा