रविवार, २७ मे, २०१२

"सत्यमेव जयते " - भ्रष्ट वैद्यकिय व्यवस्थेवर आमिरने टाकला प्रकाश

छोट्या पडद्यावर पदार्पणातच कमालीच्या यशस्वी ठरलेल्या अमीर खानच्या "सत्यमेव जयते " च्या नवीन भागात भारतातील भ्रष्ट वैद्यकिय व्यवस्थे विरुध्द आवाज उठवून नवीन सामाजिक विषयाल हात घातला आहे. यापूर्वीच्या भागातून स्त्री भ्रूणहत्या,बालकांचे लैंगिक शोषण, हुंडाबळी हे सामाजिक विषय आमिरने यशस्वीरित्या हाताळले होते.
    देवापाठोपाठ दुसरे स्थान असलेल्या किंबहुना डॉक्टरला देव मानले जाणा-या या देशातील डॉक्टरी पेशाची काळी बाजू  उजेडात आणताना आंध्र प्रदेशातील ग्रामीण भागात गरज नसताना केवळ पैशाच्या हव्यासापोटी स्त्रीयांचे गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया, गरज नसताना पेशंटच्या केल्या जाणा-या महागड्या तपासण्या त्यासाठीचे कमिशन इ. बाबींवर आमिरने प्रकाशझोत टाकला.
      ग्रामीण भागात तर जमिनी विकून  शस्त्रक्रियेचा खर्च भागवावा लागतो.चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याने वाताहत झालेल्या कुटुंबाच्या वास्तव कथा या भागात दाखवण्यात आल्या. वैद्यकिय क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने काम कारणा-या भ्रष्ट डॉक्टरांवर २००८ पासून आजपर्यंत एकाही डॉक्टरावर वैद्यकिय  परवाना कायमचा रद्ध करण्याची कारवाई मेडिकल कॉन्सील  ऑफ इंडिया कडून झाली नसल्याची धक्कादायक बाब या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढे
आली आहे.
      "कट प्रॅक्टीस" हा भयंकर प्रकार शस्त्रक्रिया,तपासण्या एवढ्या पुरत्या मर्यादित न राहता तो औषधनिर्मिती कंपन्या पर्यंत पोहचला असल्याचे पुढे आले आहे. त्याची टक्केवारी ३५ पासून ५० पर्यंत असल्याने सामान्य जनतेचे मात्र हाल होत आहेत.  महागड्या औषधउपचाराच्या  अभावाने होणारे मृत्युंचे प्रमाणही चिंताजनक असून राजस्थानच्या धर्तीवर स्वस्त दरात औषध
 विक्री करणा-या सरकारी मेडिकल दुकानाची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
      राष्ट्रीय उत्पनाच्या किमान ६% खर्च  वैद्यकिय क्षेत्रावर करणे अपेक्षित असताना तो केवळ १.४% एवढाच करण्यात येतो.वैद्यकिय महाविध्यालयातील शिक्षणाचा भरमसाठ खर्च, कमी होत चाललेला सेवाभाव, पुर्णपणे व्यवसायिक बनलेल्या या पेशाकडे अधिक गांभ्रियाने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
    सर्वच डॉक्टर किंवा हॉस्पीटल या पद्धतीने गैरप्रकार करीत नाहीत.आजही कित्येक डॉक्टर व हॉस्पीटल सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत परंतु काही स्वार्थी डॉक्टरांमुळे हा पेशा बदनाम होत आहे.वाढत्या लोकसंख्येनुसार ग्रामीण,शहरी भागातील नागरिकांना चंगल्या वैद्यकिय सेवा रास्त दरात मिळाव्यात यासाठी सरकरी हॉस्पीटलची संख्या वाढवण्याची गरज आहे, तसेच आरोग्य विम्याचे संरक्षण सर्व घटकांसाठी मिळावे यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा "सत्यमेव जयते " कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आली आहे.

बुधवार, २३ मे, २०१२

आपल्यचं फोटोवर वेगळे वेगळे इफेक्ट देवून त्यातली गंमत अनुभवण्यात एक वेगळीच मजा असते.या घडीला असे मजेशीर फोटो बनवून देणा-या कितीतरी साईट अस्तित्वात आहेत.त्यातील काहींचा वापर करून नवीन मजेशीर फोटो तयार केले. दुस-याची टिंगल करण्यापेक्षा ते बरं! आपल्याशी हि मजा शेअर करावी म्हणून एक प्रयत्न   



नाराजी अशीही !
खोटं खोटं हसू !



म्हातारपण आत्ताच !

स्केच

रस्त्यावर आपली  रांगोळी काढण्याएवढे आपण मोठे कुठाय!

 अशी बॉडी या जन्मात तर शक्य नाही म्हणून !

ही गाडी  माझी नाही बरं !

असच सहज !

 

गुरुवार, १७ मे, २०१२

वानखेडेवर कोलकत्ता विरुद्ध मुंबई चा हंगामा आहे

किंगखानचा तिथेही धिंगाणा आहे

धिंगाणा--------

शिवीला शिवीने उत्तर आहे

सगळं काही ढोंग आहे

स्पॉट फिक्सिंगपासुन लक्ष हटवण्याची हि खरी "मन्नत" आहे