बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११


  •                         कराड नगरपालिका निवडणूक सर्व काही एका क्लिक वर

    कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आघाड्याचे चित्र हळू हळू स्पष्ट होऊ लागले आहे.उमेदवारी अर्ज दाखल होतील तसे तसे लढतीचे चित्रही स्पष्ट होईल.उमेदवाराकडून हायटेक प्रचाराचे तंत्र वापरणे हि गोष्ट आता नवीन राहिली नाही
    निवडणुकी संदर्भातील सर्व माहिती संकेत स्थळाच्या माध्यमातून एका क्लिक वर उपलब्द झाल्याने नागरीकांची चांगली सोय झाली आहे.
    महाराष्ट्र विधानसभा,लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसह सांगली,अहमदनगर,ठाणे,नागपूर,नवी मुंबई, कल्याण डोंबिवली,नांदेड,धुळे, महापालिका व सोलापूर,
    बीड जिल्ह्याच्या विविध निवडणुकांमध्य आजपर्यंत यशस्वीरीत्या राबवलेल्या "अल्टीमेट इन्फोर्मेशन टेक्नोलोजी "या कंपनीने www.karadelection.org या संकेतस्थळाची निर्मिती व विकास केला आहे. दैनदिन जीवनात इंटरनेटचा वाढलेला वापर व तरुण सुशिक्षित मतदार यांच्यासाठी हे संकेतस्थळ उपयोगी ठरत आहे .मतदारांना घरबसल्या उमेदवारांची माहिती,चिन्ह,तसेच आपले नाव मतदारयादीतून शोधानाचे सहाय्य उपलब्द आहे.कराड नगरपालिकेच्या १ ते ७ प्रभाग रचना लोकसंख्या, तेथील आरक्षण एवढेच नाही तर प्रभागनिहाय आजा.आज. ची संख्या एका क्लीक वर मिळत आहे.प्रभागाचा नकाशा,प्रभागात समाविष्ट असलेल्या पेठा,चौक, इ.ची माहिती संकेतस्थळावर दिली आहे.
    माहितीबरोबरच जंनजागृतिचे कामही हे संकेतस्थळ करत आहे .उमेदवार व मतदारांना महत्त्वाच्या सुचना ,बूथ उभारातानाचे नियम,कलम १४४ चा प्रतिबंधात्मक आदेश व मतदानास येताना ओळखपत्राशिवाय ओळखीदाखल सादर करावयाच्या इतर पुराव्याची यादी प्रसिद्ध केल्यामुळे निवडणुकीच्या एकंदर प्रक्रियेत सामान्य मतदार उत्साहाने सहभागी होतील असे वाटते
    संपूर्ण कराड शहराची प्रभागनिहाय मतदारयादी संकेतस्थळावर उपलब्द असल्याने मतदारांना
    यादीतील आपला अनुक्रमांक घरबसल्या प्राप्त होत आहे.एस.एम.एस.सुविधा वापरून यादीतील आपला
    अनुक्रमांक जाणून घेण्याची सोयही लवकरच सुरु होणार आहे
    महत्वाचे संपर्क दूरध्वनी दिल्याने नागरीकांचा वेळी वाचतो आहे .अर्ज दाखल होतील तसे तसे उमेदवारांची माहिती,चिन्ह,आघाडी यांची माहिती मिळत आहे .या संकेतस्थळाला राज्य निवडणूक आयोग व भारत निवडणूक आयोग यांचा सांधा (लिंक )जोडल्यामुळे स्थळाला भेट देणारा वाचकाच्या माहितीत भर पडत आहे .

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०११

टवाळा आवडे विनोद

  तसे पाहिले तर विनोद न आवडणारा मराठी माणूस सापडणे हि फारच विरळ गोष्ट .
विनोद व विनोदाची अंगे, निर्मिती या बाबतचा प्र.के.अत्रे यांचा शालेय जीवनातील एक धडा
अजूनही आठवला कि आत्ता बदलत्या काळानुसार माराठी विनोदही  कात टाकत असल्याचं
जाणवत.  प्र.के.अत्रे  काळातले साहित्यिक विनोद शब्दिक कोटया अगदी वरच्या श्रेणीत मोडत असत “टवाळा आवडे विनोद ” अशी समजूतही खोटी पडावी अशी सध्याची अवस्था आहे .
पुर्वी वर्तमानपत्रातील रविवार पुरवणी ,दिवाळी अंक यापुरता मर्यादित असलेला विनोद महाजालाच्या रूपाने  आपल्या समोर आला तो आपलं रूपड बदलूनच ,त्या अनुषंगाने अवघी तरुणाई राजकारण, महागाई , सामाजिक प्रश्नावर विविध विनोदी चुटकुले तयार करू लागले . हि त्याची सजगता समजायला हवी .गुरुजी -मुलगा (बंड्या), आरोपी-वकील  यातून मराठी विनोद बाहेर पडला व नवीन पात्राचा   जन्मही झाला . संता- बंता , सरदार , नवरा-बायको , चिंगी -चिंटू हि नवीन विनोदी पात्रे आली आणि मराठी विनोद अधिक बहरला हे मात्र खर.
          हे माझे केवळ संकलन आहे  त्यांच्या मुळ लेखकाना आणि  त्यांच्या विनोद बद्धीला  सारे श्रेय देऊन----
                                      मला आवडलेले काही खास विनोद तुमच्यासाठी 
बॉस :- तुला नोकरी वरून काढल्यापासून तू रोज माझ्या घरासमोर हागायला का बसतोस ?
 नोकर :- मला हे दाखवायचे कि,तुम्ही मला नोकरीवरून काढल्यामुळे मी उपाशी नाही मरत......
--------------------------------------------------------------------------------------------------------- 
  
 
जसा भारताचा राष्ट्रीय पक्षी  ?  -------- मोर  
         राष्ट्रीय प्राणी ? ------     वाघ 
         राष्ट्रीय  फुल   ? ------    गुलाब  
         राष्ट्रीय मेहमान ?   ------ कसाब 
         राष्ट्रीय पागल ? ---------- दिग्विजय 
---------------------------------------------------------------------------------------------------------    
एक मुलगा शी करायला बसला,काही केल्याने शी काही होईना ,मुलगा वैतागला व म्हणाला
" अरे  ये की  बाहेर ,तुला  का खाऊन  टाकतोय  होय ?  "
---------------------------------------------------------------------------------------------------------  
पेट्रोल ७१ रुपये झाल्यावर एकदा गंपू पेट्रोलपंपावर जातो..
.पंप ऑपरेटर -कितीचं टाकू साहेब ?
गंपू - "अरे १० रुपयाचं शिंपड गाडीवर, बाहेर नेऊन जाळायचीच तर आहे "
---------------------------------------------------------------------------------------------------------  
बायको : अहो एक सांगू का? पण मारणार तर नाही ना?
नवरा : हो सांग ना. बायको : मी गरोदर आहे. नवरा : अग हि तर आनंदाची बातमी आहे मग तू एवढी घाबरतेस का?
बायको : कॉलेजला असताना हि बातमी बाबाना सांगितली होती तेव्हा त्यांनी मारलं होत.
--------------------------------------------------------------------------------------------------------- 
चिकटराव  मेंगोजूस घेऊन बसला होता... नाम्या आला आणि तो जूस पिऊन टाकला..
. चिकटराव : माझे दिवसच खराब आहे... मुलगा नापास झाला...बायको सोडून गेली......नोकरी गेली...नळाला पाणी नाही...घरात लाईट नाही... आणि आता जीव द्यावा म्हणून जूस मध्ये विष टाकले होते.......आणि तेही तू प्यायलास ..
---------------------------------------------------------------------------------------------------------