मंगळवार, १२ मार्च, २०१३

असा मिळवा ऑनलाईन सातबारा



आता घरबसल्या पाहू शकता सातबारा व मालमत्ता पत्रक

साध्या-साध्या कामासाठी प्रत्येकालाच आपल्या जमिनीचा सातबारा व घरासंबधी मालमत्ता पत्रकाची घडोघडी गरज भासते, मग त्यासाठी होणारी धावपळ,योग्य वेळी  अधिकारी न भेटल्यामुळे होणारा वेळेचा अपव्यय आता टाळता येवू शकेल. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख) या विभागामार्फत http://mahabhulekh.maharashtra.gov.in/ या साईटवर आपण सातबारा व घरासंबधी मालमत्ता पत्रकाची प्रिंट मिळवू शकतो.अतिमहत्वाच्या कायदेशीर बाबीसाठी हे उतारे जरी ग्राह्य धरले जात नसले,तरी लहानसहान कामासाठी अगदी आपल्या माहितीसाठी या प्रिंट चालू शकतात.

असा मिळवा ऑनलाईन सातबारा

सातबारा मिळवण्याच्या पाय-या समजून घ्या खालील व्हिडीओच्या मदतीने व मिळावा ऑनलाईन सातबारा घरबसल्या---------------- 






रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

शालार्थ प्रणाली कशी वापरावी ?

                       अशी वापर शालार्थ प्रणाली 
आपल्या सुविधेसाठी शालार्थ प्रणाली कशी वापरावी याची माहिती व्हावी म्हणून सोबत ब्लॉग मध्ये व्हिडीओ 
जोडत आहे.ते डाउनलोड करु शकता.
भाग १- यात आपण पाहू शकता शाळांनी रजि.पूर्ण केल्यानंतर कार्यालयाची प्राथमिक माहिती कशी भरावी 

रविवार, २७ मे, २०१२

"सत्यमेव जयते " - भ्रष्ट वैद्यकिय व्यवस्थेवर आमिरने टाकला प्रकाश

छोट्या पडद्यावर पदार्पणातच कमालीच्या यशस्वी ठरलेल्या अमीर खानच्या "सत्यमेव जयते " च्या नवीन भागात भारतातील भ्रष्ट वैद्यकिय व्यवस्थे विरुध्द आवाज उठवून नवीन सामाजिक विषयाल हात घातला आहे. यापूर्वीच्या भागातून स्त्री भ्रूणहत्या,बालकांचे लैंगिक शोषण, हुंडाबळी हे सामाजिक विषय आमिरने यशस्वीरित्या हाताळले होते.
    देवापाठोपाठ दुसरे स्थान असलेल्या किंबहुना डॉक्टरला देव मानले जाणा-या या देशातील डॉक्टरी पेशाची काळी बाजू  उजेडात आणताना आंध्र प्रदेशातील ग्रामीण भागात गरज नसताना केवळ पैशाच्या हव्यासापोटी स्त्रीयांचे गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया, गरज नसताना पेशंटच्या केल्या जाणा-या महागड्या तपासण्या त्यासाठीचे कमिशन इ. बाबींवर आमिरने प्रकाशझोत टाकला.
      ग्रामीण भागात तर जमिनी विकून  शस्त्रक्रियेचा खर्च भागवावा लागतो.चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याने वाताहत झालेल्या कुटुंबाच्या वास्तव कथा या भागात दाखवण्यात आल्या. वैद्यकिय क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने काम कारणा-या भ्रष्ट डॉक्टरांवर २००८ पासून आजपर्यंत एकाही डॉक्टरावर वैद्यकिय  परवाना कायमचा रद्ध करण्याची कारवाई मेडिकल कॉन्सील  ऑफ इंडिया कडून झाली नसल्याची धक्कादायक बाब या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढे
आली आहे.
      "कट प्रॅक्टीस" हा भयंकर प्रकार शस्त्रक्रिया,तपासण्या एवढ्या पुरत्या मर्यादित न राहता तो औषधनिर्मिती कंपन्या पर्यंत पोहचला असल्याचे पुढे आले आहे. त्याची टक्केवारी ३५ पासून ५० पर्यंत असल्याने सामान्य जनतेचे मात्र हाल होत आहेत.  महागड्या औषधउपचाराच्या  अभावाने होणारे मृत्युंचे प्रमाणही चिंताजनक असून राजस्थानच्या धर्तीवर स्वस्त दरात औषध
 विक्री करणा-या सरकारी मेडिकल दुकानाची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
      राष्ट्रीय उत्पनाच्या किमान ६% खर्च  वैद्यकिय क्षेत्रावर करणे अपेक्षित असताना तो केवळ १.४% एवढाच करण्यात येतो.वैद्यकिय महाविध्यालयातील शिक्षणाचा भरमसाठ खर्च, कमी होत चाललेला सेवाभाव, पुर्णपणे व्यवसायिक बनलेल्या या पेशाकडे अधिक गांभ्रियाने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
    सर्वच डॉक्टर किंवा हॉस्पीटल या पद्धतीने गैरप्रकार करीत नाहीत.आजही कित्येक डॉक्टर व हॉस्पीटल सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत परंतु काही स्वार्थी डॉक्टरांमुळे हा पेशा बदनाम होत आहे.वाढत्या लोकसंख्येनुसार ग्रामीण,शहरी भागातील नागरिकांना चंगल्या वैद्यकिय सेवा रास्त दरात मिळाव्यात यासाठी सरकरी हॉस्पीटलची संख्या वाढवण्याची गरज आहे, तसेच आरोग्य विम्याचे संरक्षण सर्व घटकांसाठी मिळावे यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा "सत्यमेव जयते " कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आली आहे.

बुधवार, २३ मे, २०१२

आपल्यचं फोटोवर वेगळे वेगळे इफेक्ट देवून त्यातली गंमत अनुभवण्यात एक वेगळीच मजा असते.या घडीला असे मजेशीर फोटो बनवून देणा-या कितीतरी साईट अस्तित्वात आहेत.त्यातील काहींचा वापर करून नवीन मजेशीर फोटो तयार केले. दुस-याची टिंगल करण्यापेक्षा ते बरं! आपल्याशी हि मजा शेअर करावी म्हणून एक प्रयत्न   



नाराजी अशीही !
खोटं खोटं हसू !



म्हातारपण आत्ताच !

स्केच

रस्त्यावर आपली  रांगोळी काढण्याएवढे आपण मोठे कुठाय!

 अशी बॉडी या जन्मात तर शक्य नाही म्हणून !

ही गाडी  माझी नाही बरं !

असच सहज !

 

गुरुवार, १७ मे, २०१२

वानखेडेवर कोलकत्ता विरुद्ध मुंबई चा हंगामा आहे

किंगखानचा तिथेही धिंगाणा आहे

धिंगाणा--------

शिवीला शिवीने उत्तर आहे

सगळं काही ढोंग आहे

स्पॉट फिक्सिंगपासुन लक्ष हटवण्याची हि खरी "मन्नत" आहे 

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११


  •                         कराड नगरपालिका निवडणूक सर्व काही एका क्लिक वर

    कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आघाड्याचे चित्र हळू हळू स्पष्ट होऊ लागले आहे.उमेदवारी अर्ज दाखल होतील तसे तसे लढतीचे चित्रही स्पष्ट होईल.उमेदवाराकडून हायटेक प्रचाराचे तंत्र वापरणे हि गोष्ट आता नवीन राहिली नाही
    निवडणुकी संदर्भातील सर्व माहिती संकेत स्थळाच्या माध्यमातून एका क्लिक वर उपलब्द झाल्याने नागरीकांची चांगली सोय झाली आहे.
    महाराष्ट्र विधानसभा,लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसह सांगली,अहमदनगर,ठाणे,नागपूर,नवी मुंबई, कल्याण डोंबिवली,नांदेड,धुळे, महापालिका व सोलापूर,
    बीड जिल्ह्याच्या विविध निवडणुकांमध्य आजपर्यंत यशस्वीरीत्या राबवलेल्या "अल्टीमेट इन्फोर्मेशन टेक्नोलोजी "या कंपनीने www.karadelection.org या संकेतस्थळाची निर्मिती व विकास केला आहे. दैनदिन जीवनात इंटरनेटचा वाढलेला वापर व तरुण सुशिक्षित मतदार यांच्यासाठी हे संकेतस्थळ उपयोगी ठरत आहे .मतदारांना घरबसल्या उमेदवारांची माहिती,चिन्ह,तसेच आपले नाव मतदारयादीतून शोधानाचे सहाय्य उपलब्द आहे.कराड नगरपालिकेच्या १ ते ७ प्रभाग रचना लोकसंख्या, तेथील आरक्षण एवढेच नाही तर प्रभागनिहाय आजा.आज. ची संख्या एका क्लीक वर मिळत आहे.प्रभागाचा नकाशा,प्रभागात समाविष्ट असलेल्या पेठा,चौक, इ.ची माहिती संकेतस्थळावर दिली आहे.
    माहितीबरोबरच जंनजागृतिचे कामही हे संकेतस्थळ करत आहे .उमेदवार व मतदारांना महत्त्वाच्या सुचना ,बूथ उभारातानाचे नियम,कलम १४४ चा प्रतिबंधात्मक आदेश व मतदानास येताना ओळखपत्राशिवाय ओळखीदाखल सादर करावयाच्या इतर पुराव्याची यादी प्रसिद्ध केल्यामुळे निवडणुकीच्या एकंदर प्रक्रियेत सामान्य मतदार उत्साहाने सहभागी होतील असे वाटते
    संपूर्ण कराड शहराची प्रभागनिहाय मतदारयादी संकेतस्थळावर उपलब्द असल्याने मतदारांना
    यादीतील आपला अनुक्रमांक घरबसल्या प्राप्त होत आहे.एस.एम.एस.सुविधा वापरून यादीतील आपला
    अनुक्रमांक जाणून घेण्याची सोयही लवकरच सुरु होणार आहे
    महत्वाचे संपर्क दूरध्वनी दिल्याने नागरीकांचा वेळी वाचतो आहे .अर्ज दाखल होतील तसे तसे उमेदवारांची माहिती,चिन्ह,आघाडी यांची माहिती मिळत आहे .या संकेतस्थळाला राज्य निवडणूक आयोग व भारत निवडणूक आयोग यांचा सांधा (लिंक )जोडल्यामुळे स्थळाला भेट देणारा वाचकाच्या माहितीत भर पडत आहे .